Home > News Update > कोरोना पॉझिटीव्ह असल्यास ५ दिवस गृहविलगीकरणात ठेवणार ; टास्क फोर्सचा निर्णय

कोरोना पॉझिटीव्ह असल्यास ५ दिवस गृहविलगीकरणात ठेवणार ; टास्क फोर्सचा निर्णय

कोरोना पॉझिटीव्ह असल्यास ५ दिवस गृहविलगीकरणात ठेवणार ; टास्क फोर्सचा निर्णय
X

Mumbai - महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे टास्क फोर्सने खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. तसेच याबाबत मोठा निर्णय टास्क फोर्सच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. यापुढे कोरोनाची लागण झाल्यास त्या व्यक्तीला ५ दिवस गृहविलगीकरणात ठेवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात टास्क फोर्समार्फत लवकरच नियमावली देखील जाहीर केली जाणार आहे. राज्यात सध्या ८६२ रुग्ण सक्रिय आहेत. गेल्या दहा दिवसांत ही रुग्णसंख्या ६ पटीने वाढली आहे. त्यामुळे कोरोना झाल्यास आधी गृहविलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्यात. वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलांना मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. तसेच अशा व्यक्तींना कुटुंबातील कोरोना झालेल्या व्यक्तींपासून दूर ठेवावे असे सांगण्यात आले आहे.

राज्यात कोरोनासह JN 1 चे रुग्ण देखील वाढत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात सध्या एकूण ८ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळेत. बुलढाणा जिल्ह्यात नव्याने ७ कोरोना संसर्गितांची भर पडली आहे. त्यात शेगाव येथील २ चिखली येथील २ (महिला ) तर बुलढाणा शहर व तालुक्यातील एकूण ४ जणांचा समावेश आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक जानेवारी रोजी पहिला कोरोना संसर्गित आढळून आला आहे. आता नव्याने ७ जण संसर्गीत आढळल्याने एकूण संख्या ८ झाली आहे. शिरपूर येथील ५० वर्षीय कोरोना संसर्गीत महिलेला स्त्री रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Updated : 4 Jan 2024 8:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top