Home > News Update > आरोग्य सेवक परीक्षेमध्ये घोळ झाला तर परीक्षा रद्द करून नव्याने घेऊ: अजित पवार

आरोग्य सेवक परीक्षेमध्ये घोळ झाला तर परीक्षा रद्द करून नव्याने घेऊ: अजित पवार

राज्यात आरोग्यसेवक, लॅब असिस्टंट अशा 54 वेगवेळ्या पदासाठीच्या 3 हजार 277 हजार जागांसाठी झालेल्या लेखी परीक्षा घोळ झाला तर परीक्षा रद्द करून नव्याने घेऊ. कंपनी दोषी असेल तर तिच्यावर कठोर कारवाई करू, सोमवारी आरोग्यमंत्री संदर्भात घोषणा करतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

आरोग्य सेवक परीक्षेमध्ये घोळ झाला तर परीक्षा रद्द करून नव्याने घेऊ: अजित पवार
X

आरोग्य सेवकांच्या परीक्षेत घोळ झाल्याचा मुद्दा आमदार विनायक मेटे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता.

राज्यात नुकतीच आरोग्यसेवक, लॅब असिस्टंटसाठी परीक्षा घेण्यात आल्यात. अनेक ठिकाणी पेपर फुटल्याचा आरोप परीक्षार्थीनी केला आहे. आरोग्यसेवक, लॅब असिस्टंट अशा 54 वेगवेळ्या पदासाठीच्या 3 हजार 277 हजार जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. पेपरचा गठ्ठा वर्गात येण्यापूर्वीच त्याची सील फोडण्यात आले असल्याचे आरोप व्हायरल झालेल्या व्हिडिओ परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केला आहे, असे आमदार विनायक मेटे यांनी सांगितले.

सट्टा मटका अजित पवार म्हणाले की आरोग्य मंत्री राजेश टोपे सध्या कोरोनामुळे आजारी आहेत ते सोमवारी सभागृहात येणार आहेत.

या परीक्षांमध्ये काही काळ झाला असेल तर परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेऊन दोषी कंपनीवर ही कारवाई करू असे आश्वासन अजित पवार यांनी विधान परिषदेत दिले.

बंद लिफाफ्यात असलेला पेपर वर्गखोलीत येऊन फोडणे अपेक्षित असताना अगोदरच सील फोडल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले, त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी संपूर्ण घटनाक्रमाचे व्हिडीओ बनवत ते व्हायरल केले आहे. पेपर हे अगोदर केव्हा फोडले, का फोडले, कोणाच्या मदतीसाठी फोडले? असे सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहे.

Updated : 2 March 2021 7:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top