आयडीबीआय बँकेच्यावतीने ४० लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द

पुणे, दि. १०- उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आयडीबीआय बँकेच्यावतीने ४० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्‍यात आला. ही मदत पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोनाविरुध्द लढ्यासाठी देण्यात आली आहे. तसेच इतर आवश्यक साहित्यही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी आयडीबीआय बँकेचे अध्यक्ष रवी नारायणन, आयडीबीआयचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक संजय पणीकर तसेच विभागीय आयुक्त् ‍ डॉ. दीपक म्‍हैसेकर, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा..

राज्यातील होम क्वारंटाईनची संख्या किती आहे? तुम्हाला माहिती आहे का?

मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाला कुठे नेमले ते पहा

…तर पुन्हा लॉकडाऊन: अजित पवार

Source: Maharashtra Govt now

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here