News Update
Home > News Update > तुकाराम मुंढे यांची अखेर नवीन ठिकाणी नियुक्ती

तुकाराम मुंढे यांची अखेर नवीन ठिकाणी नियुक्ती

तुकाराम मुंढे यांची अखेर नवीन ठिकाणी नियुक्ती
X

नागपूर महापालिकेत महापौर संदीप जोशी आणि भाजपच्या इतर नगरसेवकांच्या विरोधामुळे बदली करण्यात आलेल्या तुकाराम मुंढे यांना अखेर नियुक्ती देण्यात आली आहे. मुंढे यांची राज्याच्या मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती देण्यात आली आहे. राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय सरकारने बुधवारी घोषित केला. त्यामध्ये उदय जाधव यांची राज्याच्या बालहक्क आयोगाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे, ते सध्या राष्ट्रीय ग्रामीण जीवन मिशनच्या सीईओपदी कार्यरत होते. त्याचबरोबर MPCLचे एमडी अरविंद कुमार यांची मार्केटिंग अँड टेक्स्टाईल विभागात बदली करण्यात आली आहे. तर डी.बी. गावडे यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय सरकारने बुधवारी घोषित केला. त्यामध्ये उदय जाधव यांची राज्याच्या बालहक्क आयोगाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे, ते सध्या राष्ट्रीय ग्रामीण जीवन मिशनच्या सीईओपदी कार्यरत होते.

कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका सुरू केला होता. यामुळे त्यांचा महापौर आणि भाजपच्या इतर नगरसेवकांशी संघर्ष सुरू झाला.

त्यानंतर तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण काही दिवसातच सरकारने त्यांच्या बदलीचा आदेश रद्द केला होता. तेव्हापासून तुकाराम मुंढे हे नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते.


Updated : 2021-01-13T20:59:52+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top