Home > News Update > केंद्रेकरांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

केंद्रेकरांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

नेहमी आपल्या साधेपणामुळे ओळखले जाणारे सनदी अधिकारी सुनील केंद्रकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आठवडी बाजारात जाऊन स्वतः बाजार करतानाचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

केंद्रेकरांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
X

अधिकारी म्हंटलं की नेहमी एसी कार्यालय, अलिशान गाड्या, हाताखाली नोकर-चाकर असे चित्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. एवढच नाही तर सादा तलाठी सुद्धा बाजराला गेले तर सोबत पिशवी पकडण्यासाठी कोतवाल असल्याचं अनेकदा पाहायला मिळतात. मात्र असे असतानाही केंद्रकर यांच्यासारखे अधिकारी किंचितवेळा पाहायला मिळतात.

शेतकरी कुटुंबातील केंद्रकर हे नेहमी आपल्या कडक शिस्तीच्या आणि सामान्य साठी निर्णय घेणारे अधिकारी म्हणून चर्चेत असतात. त्यामुलळे त्यांची नेहमीच चर्चा असते. आता त्याचे आठवडी बाजारात पत्नीसोबत बाजार करतानाचे फोटो समोर आले आहे. ज्यात बाजाराची पिशवी स्वतःच्या खंदावर घेताना केंद्रकर दिसत आहे.




औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील बाजारातील हे फोटो आहे. आज सकाळी केंद्रकर खुलताबाद येथे गेले असताना त्यांना बाजार दिसला आणि त्यांनी पत्नीसोबत बाजार केला.विशेष म्हणजे त्याच्यासोबत कोणताही सुरक्षारक्षक सुद्धा नव्हता.त्यामुळे केंद्रकर यांचा पुन्हा एकदा साधेपणा समोर आला आहे.

Updated : 16 Jan 2021 8:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top