Home > News Update > पंकजा मुंडे यांची पुढची दिशा अखेर ठरली!...

पंकजा मुंडे यांची पुढची दिशा अखेर ठरली!...

पंकजा मुंडे यांची पुढची दिशा अखेर ठरली!...
X

“मी पक्ष सोडणार नाही. पक्षाला मला सोडायचं असेल तर ते खुशाल निर्णय घेऊ शकतात. मी राज्यभर दौरा करणार. मी वज्रमूठ बांधणार. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार,’ असं म्हणत पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी पक्षात आलबेल नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.

यावेळी पंकजा मुंडे यांनी “पंकजा मुंडे पक्ष सोडणार अशी बातमी कोणी लावली? याचा शोध घ्यावा तसंच कोअर कमिटीमधून मला मुक्त करावं,” असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आज कोअर कमीटीचा राजीनामा दिला आहे. पंकजा मुंडे पदासाठी दबाव आणतात. या चर्चेला पुर्णविराम देण्यासाठी मी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमीटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.

“शेवटच्या दिवसापर्यंत भाजपाचा प्रत्येक आमदार निवडून यावा यासाठी मी प्रयत्न करत होते. आणि मी बंड करणार अशी पुडी कोणी सोडली. माझी अपेक्षा कोणाकडूनही नाही, त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच नाही. माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. त्यामुळे मी बंड करणार नाही,” असं म्हणत ‘मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. बेईमानी आमच्या रक्तात नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. हा पक्ष माझ्या बापाचा आहे सांगत पंकजा

मुंडे यांनी आपण अद्यापही पक्षात राहणार असल्याचं जाहीर केलं.’ आज गोपिनाथ गडावर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते दिवंगत गोपिनाथ मुंडे यांची जयंती सोहळा पार पडला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर, पाशा पटेल यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे उपस्थित होते.

यातील बहुतेक नेत्यांच्या भाषणाचा जर रोख पाहिला तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच होता. दरम्यान या सर्व घडामोडी पाहता भाजपचा अंतर्गत वाद समोर आला आहे.

Updated : 12 Dec 2019 11:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top