Home > News Update > वाहनाच्या धडकेने तरस प्राण्याचा बळी

वाहनाच्या धडकेने तरस प्राण्याचा बळी

विंग रस्त्यावरील एका ढाब्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस या पक्षाची दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्क्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मृतदेह वनविभागाने ताब्यात घेतले आहे.

वाहनाच्या धडकेने तरस प्राण्याचा बळी
X

याबाबत सविस्तर वृत्त अशी कि, कराड (Karad) तालुक्यातील विंग परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या (Leopard) ठार झाल्याची घटना घडली होती. सदर घटना ताजी असताना आता विंग रस्त्यावरील आशीर्वाद ढाब्याजवळ एका वाहनाच्या धडकेत तरस (hyena death) या पक्षाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेविषयी स्थानिक नागरीक राजू पाचुपते यांनी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे (Rohan Bhate) यांना कळविले. त्यावर लागली वनविभाग घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

व मृतदेह ताब्यात घेतले. तत्पूर्वी अलीकडे वन्य प्राण्यांचे अधिवास हळूहळू नष्ट होत आहे. यामुळे मानवाने प्राण्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अतिक्रमण करायला सुरुवात केली आहे. परिणामी प्राणी (animals) आता वस्त्यांवर हल्ले करणे, गावात शिरकाव करणे आदी घटना घडायला लागल्या आहे. त्यामुळे अशा वाहनधारकांवरती कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Updated : 3 April 2023 5:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top