Home > News Update > बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर, मंत्र्यांनी दिली होती एन्काउंटरची धमकी

बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर, मंत्र्यांनी दिली होती एन्काउंटरची धमकी

बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर, मंत्र्यांनी दिली होती एन्काउंटरची धमकी
X

तेलंगाना च्या एका मंत्र्यांनी बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीला एन्काउंटर चा इशारा दिला होता. या आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रकवर आढळला आहे. आरोपीवर 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप होता. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार जेव्हा आरोपीने ट्रेनच्या समोर उडी मारली तेव्हा हा आरोपी पळून जात होता. तेलंगाना पोलिसांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

मंगळवारी तेलंगाना चे मंत्री मल्ला रेड्डी यांनी आरोपीचं एनकाउंटर केलं जाईल. असं विधान केलं होतं. माध्यमांशी बोलताना त्यांनी बलात्कार करणाऱ्याला पकडून आम्ही त्याचं एनकाउंटर करु अशी घोषणा केली होती. त्यानंतर या आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला आहे.

आरोपीचं वय 30 वर्षे होतं. आरोपीवर पोलिसांनी 10 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. आरोपी सदर पीडित मुलीचा शेजारी होता. गेल्या रविवारी एका 6 वर्षाच्या मुलीचा मृतदेह राजू च्या घरी आढळला होता. तेव्हापासून राजू घरातून गायब होता.

Updated : 16 Sep 2021 8:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top