Home > News Update > समाजातील शांतता आणि सलोखा बिघडणार नाही, अशी आश्वासन पोलिसांनी दिली, हुसेन दलवाई

समाजातील शांतता आणि सलोखा बिघडणार नाही, अशी आश्वासन पोलिसांनी दिली, हुसेन दलवाई

समाजातील शांतता आणि सलोखा बिघडणार नाही, अशी आश्वासन पोलिसांनी दिली, हुसेन दलवाई
X

हिंदू संघटनेतर्फे दादर (Dadar) ते कामगार मैदान अशी हिंदू जन आक्रोश रॅली काढण्यात आली. या मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडली असली तरी समाजातील शांतता आणि सलोखा बिघडू देणार नाही, अशी आश्वासन मुंबई पोलीस आयुक्तांनी दिल्याची माहिती माजी खासदार 'हुसेन दलवाई' (Hussain Dalwai) यांनी दिली आहे.

माजी खासदार 'हुसेन दलवाई' यांच्या नेतृत्वाखाली 'मौलाना आझाद' (Maulana Azad) विचार मंचाच्या शिष्टमंडळाने मुंबईचे पोलीस आयुक्त 'विवेक फणसळकर' (Vivek Phansalkar) यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते 'सलीम अलवारे', मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक सुफियान वणू, इरफान पटेल असे अनेक कार्यकर्ते तेथे उपस्थित होते.

याबाबत 'हुसेन दलवाई' म्हणाले की, या मोर्चात लव्ह जिहाद, धर्मांतर आणि मुस्लिम समाजाच्या विरोधात वाईट शब्द आणि घृणास्पद घोषणा देण्यात आल्या. तेलंगणाचे आमदार 'टी. राज सिंह' (T. Raj Singh) यांनी अतिशय भडकवाऊ भाषण करून मुस्लिमांचे गळे कापण्याचे आदेश दिले. तसेच शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्तेही छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते. बजरंग दल, सनातन धर्म इत्यादी संघटना होत्या. डॉ नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, पत्रकार कलबुर्गी यांच्या हत्येचा आरोप शिवप्रतिष्ठान आणि सनातन धर्मावर आहे.

मुस्लीम, दलित, ओबीसी, कुणबी अशा सर्व धर्म, जातीच्या लोकांना एकत्र आणून शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात एक आदर्श राज्य निर्माण केले होते. अशा मोर्चात महाराजांच्या नावाची बदनामी केली गेली. या संस्थेतर्फे महाराष्ट्रात विविध 20 ठिकाणी असे कार्यक्रम घेण्यात आल्याचे बोलले जाते, पण महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस याबाबत गप्प कसे बसतात? असा प्रश्न शिष्टमंडळाने उपस्थित केला. समाजात द्वेषाचे वातावरण निर्माण करून आगामी काळात महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा या संघटनांचा डाव असल्याचे बोलले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश दिले असून आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. समाजातील शांतता आणि सलोखा भंग होऊ देणार नाही, अशी आश्वासन मुंबई पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिली. अशा घटनेचा अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून, कोणत्याही समाजाने कोणत्याही प्रकारच्या भीतीने जगू नये, अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस पूर्णपणे सज्ज असल्याचे दलवाई यांनी सांगितले.

Updated : 8 Feb 2023 2:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top