Home > News Update > ऑनलाईन घटस्फोट, पत्नी मलेशियात आणि पती जळगावात

ऑनलाईन घटस्फोट, पत्नी मलेशियात आणि पती जळगावात

ऑनलाईन घटस्फोट, पत्नी मलेशियात आणि पती जळगावात
X

लॉकडाऊनमुळे पती पत्नीला घटस्फोटासाठी जळगावच्या कौटुंबिक न्यायालयात हजर राहणं शक्य नसल्याने मलेशियाहुन पत्नी आणि जळगाव येथील पतीने व्हिडीओ कॉलिंगद्वारे घटस्फोट घेतला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे जगभरात सर्व प्रवासी वाहतूक बंद आहे. न्यायालयांच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे.

अशात जळगावच्या कौटुंबीक न्यायालयाने व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून सुनावणी घेत एका दाम्पत्याला गुरुवारी घटस्फोट दिला. यातील पत्नीने थेट मलेशियातून व्हिडिओ कॉलिंगवरून न्यायालयात जबाब दिला. तर पती मात्र, जळगावातच होता. लॉकडाऊनच्या काळात अशाप्रकारे सुनावणी होऊन घटस्फोट घेतल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.

हे ही वाचा...

सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी प्रशांत भूषण दोषी

आपत्ती म्हणजे काय? आपत्ती व्यवस्थापन काय असते?

पार्थ पवारांचा बोलविता धनी कोण?: सामना

जळगावमधील तरुण आणि पुण्यातील तरुणीचा विवाह 2018 मध्ये झाला होता. विवाहानंतर दोनच महिन्यात या दोघांमध्ये मतभेद झाले. दोघांना एकमेकांचे विचार पटत नव्हते. अखेर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये कौटुंबीक न्यायालयात हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवण्यात आले.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे घटस्फोट लांबत असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दोन्ही पक्षांच्या संमतीने व्हिडिओ कॉलिंगवर सुनावणी घेण्यात आली. दोनवेळा सुनावणी घेऊन दोघांचे जबाब नोंदवण्यात आले. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर दोघांमध्ये परस्पर समन्वयातून घटस्फोट झाल्याचा निकाल न्यायालयाने दिला.

Updated : 14 Aug 2020 2:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top