रेमडेसिवीरचा प्रश्न आता हायकोर्टाच्या दारी, एका संस्थेचे मुख्य न्यायाधीशांना पत्र
X
सध्या राज्यात रेमडीसीवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर अनेक कंपन्यांकडे इंडजेक्शनचा साठा पडुन असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर जीवन जगण्याच्या अधिकाराचे रक्षण व्हावे यासाठी राज्यातील रुग्णालयांना रेमडेसिवीर इंजेक्शन उप्लब्ध करुन देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारे पत्र मुंबई मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेने हायकोर्टाने मुख्य न्यायाधीश आणि रजिस्ट्रार जनरल यांना पाठवले आहे.
या पत्रालाच जनहित याचिका समजून हायकोर्टाने पुढील मागणी संदर्भात योग्य ते आदेश द्यावे अशी विनंती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनावर उपयुक्त असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी लोकांना वणवण फिरावे लागत आहे, तरी ते मिळत नाही. हे रेमडेसिवीर इंजेक्शसन न मिळाल्याने अनेकांचे जीव गेले आहेत. या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत आहे.
नागरीकांच्या जीवाचे रक्षण व मागेल त्याला आरोग्य सुविधा देणे हे राज्याचे कर्तव्य असतानाही ते राज्याकडून पार पाडले जात नाही. तसेच काळाबाजार रोख्याकरीता उपायोजना केल्या जात नाही. त्यामुळे मुख्य न्यायाधीशांनी नागरीकांच्या जीवाचे रक्षण करण्याकरीता लोकांना रेमडेसिवीर हे इंजेक्शन त्वरीत रुग्णालयात उप्लब्ध करुण देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे सचिव मनिष देशपांडे व संचालक आण्णा जोगदंड यांनी दिली आहे.