Home > News Update > हम वंदे मातरम् नहीं कहेंगे; अबू आझमी

हम वंदे मातरम् नहीं कहेंगे; अबू आझमी

हम वंदे मातरम् नहीं कहेंगे; अबू आझमी
X

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलीय. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वंदे मातरम म्हणण्यास नकरा दिल्यानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. त्यामुळं दहा मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकुब करण्यात आलं होतं.

अबू आझमी यांनी आज विधानसभेत अल्ताफ पुनावाला प्रकरण मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, मुसलमानांची जाणिवपूर्वक बदनामी केली जाते. महाराष्ट्रात सकल हिंदू समाजाची रॅली निघाली होती. त्यात मुसलमानांचा अपमान करण्यात आला. त्यामुळं असं वाटायला लागलं होतं की मुसलमानांपेक्षा सर्वात मोठा देशद्रोही कुणी नसेल, अशी भावना आझमी यांनी व्यक्त केली. औरंगाबाद इथल्या घटनेचा दाखला देत आझमी म्हणाले, “ आंदोलक म्हणतात इस देश में रहना है तो वंदे मातरम कहना पडेगा. औरंगाबादच्या घटनेचा उल्लेख करत आझमींनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला. “हम अल्लाह को मानते है, इसलिए वंदे मातरम नहीं कहेंगे,” अशा स्पष्ट शब्दात आझमींनी वंदे मातरम म्हणण्यास विरोध केला. आम्ही जगात कुणासमोरही मान वाकवू शकत नाही. आम्ही आमच्या आईच्या समोर देखील डोकं वाकवत नाही. आमचा धर्म आम्हांला असं करायला परवानगी देत नसल्याचं आझमींनी स्पष्ट केलं.

Updated : 19 July 2023 9:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top