Home > News Update > दिलासादायक ! 24 तासात कोरोनामुक्तीचा दर 2 लाखांच्या घरात

दिलासादायक ! 24 तासात कोरोनामुक्तीचा दर 2 लाखांच्या घरात

देशात ओमायक्रॉन व्हेरियंटने हातपाय पसरायला सुरूवात केल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ व्हायला सुरूवात झाली. त्यातच दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोनामुक्तीचे प्रमाण दोन लाखांच्या घरात पोहचले आहे.

दिलासादायक ! 24 तासात कोरोनामुक्तीचा दर 2 लाखांच्या घरात
X

देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती. मात्र मंगळवारी कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट झाली होती. मात्र बुधवारी कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदली गेली. गेल्या 24 तासात 2 वाख 82 हजार 90 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ही रुग्णवाढ मंगळवारच्या तुलनेत तब्बल 44 हजार 952 इतकी अधिक आहे. मंगळवारी 2 लाख 38 हजारांपर्यंत रुग्णसंख्येत घट झाली होती. मात्र बुधवारी पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाल्याने देशाचे टेन्शन वाढले आहे.

दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात देशात 1 लाख 88 हजार 157 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यासह आतापर्यंत 3 कोटी 55 लाख 83 हजार 39 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यासह 18 लाख 31 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र गेल्या 24 तासात देशात 441 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात 4 लाख 87 हजार 202 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात ओमायक्रॉन व्हेरियंटची रुग्णसंख्याही वाढत आहे. आतापर्यंत 8 हजार 961 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात 1860 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1 हजार 1 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

राज्यात गेल्या 24 तासात 39 हजार 207 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 53 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. याबरोबरच राज्यात 24 तासात 38 हजार 824 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यासह राज्याचा कोरोनामुक्तीचा दर 94.32 टक्क्यांवर पोहचला आहे.

Updated : 19 Jan 2022 4:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top