Home > News Update > २६ जानेवारीच्या शेतकरी आंदोलनातून सरकारने घेतला धडा, लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच उभारली शिपिंग कंटेनरची उंच भिंत...

२६ जानेवारीच्या शेतकरी आंदोलनातून सरकारने घेतला धडा, लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच उभारली शिपिंग कंटेनरची उंच भिंत...

२६ जानेवारीच्या शेतकरी आंदोलनातून सरकारने घेतला धडा, लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच उभारली शिपिंग कंटेनरची उंच भिंत...
X

२६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारातुन धडा घेत आता केंद्र सरकारने १५ ऑगस्टसाठी विशेष तयारी केली आहे. यावेळी १५ ऑगस्टला लाल किल्ल्याच्या संरक्षणासाठी महाकाय कंटेनरचा वापर केला जात आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ एका वर एक कंटेनरची संपूर्ण भिंतच बांधण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे.

तसेच ही भिंत इतकी उंच बांधण्यात आली आहे की, आता चांदणी चौकातून पंतप्रधानांना ध्वजारोहण करताना पाहणे शक्य नाही.

दिल्ली पोलिसांतील संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सीमेवर नुकत्याच झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच हे कंटेनर रंगाने सजवले जातील. २६ जानेवारी रोजी आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती, परंतु काही तासातच ट्रॅक्टर दिल्लीत दाखल झाले, पोलिसांसोबत झालेल्या हिंसक चकमकींची दृश्य ही सर्वांनी पहिली.

मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात ३९४ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

मोदी सरकारने २६जानेवारीच्या घटनेपासून धडा घेत विशेष तयारी करत आहे. दरवर्षी पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला संबोधित करतात.

१५ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांची काय तयारी आहे...

नुकतंच, एका वृत्तवाहिनीने शेतकरी नेते राकेश टिकैत यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या रणनीतीवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आम्ही दिल्लीत प्रवेश करण्यासाठी आणि शांततेत ध्वज फडकवण्यासाठी सरकारकडून परवानगी घेऊ.

सीमेवर वाढलेल्या कारवायांदरम्यान गुप्तचर यंत्रणा सतर्क...

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या सीमेवर वाढलेल्या कारवाया पाहता गुप्तचर विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीमेवर अर्ध्या डझनहून अधिक वेला ड्रोन ऍक्टिवेट असल्याचं दिसून आलं आहे. तसेच तिथे शस्त्र आणि स्फोटक असल्याची पुष्टी सुद्धा करण्यात आली आहे. अशा परिस्थितीमुळे सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत केली जात असल्याचं म्हटलं जात आहे.

Updated : 8 Aug 2021 1:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top