Home > News Update > पत्रकारांना लिहू नये असं कसं सांगता येईल? मोहम्मद झुबेरला ताबडतोब मुक्त करा : सुप्रिम कोर्ट

पत्रकारांना लिहू नये असं कसं सांगता येईल? मोहम्मद झुबेरला ताबडतोब मुक्त करा : सुप्रिम कोर्ट

पत्रकारांना लिहू नये असं कसं सांगता येईल? मोहम्मद झुबेरला ताबडतोब मुक्त करा : सुप्रिम कोर्ट
X

पत्रकारांनी लिहू नये असं सागणं म्हणजे वकिलांनी युक्तीवाद करु नये असं सांगण्यासारखं आहे. चुक केली तर कारवाई कायद्यानं होईल. फॅक्टचेकर मोहम्मद झुबेरला जामीन नाकारण्याचे कोणतेही कारण दिसत नाही, त्यांना सर्व FIR प्रकरणे उत्तरप्रदेश पोलिसांची एसआयटी बरखास्त करुन दिल्ली पोलिसांकडे तपास देऊन संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झुबेरची कारागृहात सुटका करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले.

मोहम्मद झुबेर यांना जामीन नाकारण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही. त्यामुळे त्यांना कलम ३२ अंतर्गत सर्व प्रकरणामध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात येत आहे, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच मोहम्मद झुबेर यांच्या विरोधातील सर्व एफआयआर दिल्ली पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात यावेत, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहे.अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच त्यांची तत्काळ कारागृहातून सुटका करावी, असे निर्देशही न्यायाल्याने दिले आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या खडंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

उत्तरप्रदेश सरकारचे अधिवक्ता गरीमा प्रषाद यांनी झुबेराला ट्विट करणं आणि बोलण्यापासून रोखण्याची मागणी केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्या. चंद्रचुड यांनी पत्रकारांना लिहण्या बोलण्यापासून कसं रोखता येईल. चुक केली तर कायद्याने कारवाई होईल. त्यावर प्रषाद यांना ट्विट करण्यापासून रोखावे ते पुरावे नष्ट करतील असं सांगितलं. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं सगळं काही पब्लिक डोमेन मध्ये आहे. त्यामुळं असे आदेश देण्याची गरज नसल्याचे सांगितले.

उत्तर प्रदेशात दाखल झालेल्या सात गुन्ह्या प्रकरणी पातियाळा कोर्टात २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीनाची प्रक्रीया पूर्ण करुन तिहार प्रशासनाने मोहम्मद झुबेरला मुक्त करण्याचे आदेश सुप्रिम कोर्टानं दिले आहे.

आवश्यकता असल्यास झुबेर यांनी जामीन रद्द करण्यासाठी दिल्ली हायकोर्टात जाण्याचं स्वातंत्र्य आहे. यापुढे अजून काही गुन्हे दाखल झाले तरी ते दिल्ली पोलिसांकडे तपासासाठी द्यावेत असेही आदेश कोर्टानं दिले आहेत. झुबेरने यांनी २०१८ मध्ये पोस्ट केलेल्या कथित आक्षेपार्ह ट्विटवरून दिल्लीत दाखल केलेल्या गुन्ह्याशिवाय उत्तर प्रदेशातील गाझियाबाद, मुझफ्फरनगर, चांदोली येथे एकूण सात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तसेच लखीमपूर खेरी, सीतापूर आणि हाथरस येथेही जुबेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.

Updated : 20 July 2022 1:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top