Home > News Update > संकटाच्या काळात कामगारांना आधार देणारं SHRAMECO Application

संकटाच्या काळात कामगारांना आधार देणारं SHRAMECO Application

संकटाच्या काळात कामगारांना आधार देणारं SHRAMECO Application नक्की काय आहे? कामगारांना या Application चा नक्की काय फायदा होणार? पाहा कामगारांची तळमळ असलेले SHRAMECO App चे निर्माते विकास औटे यांची मॅक्सवूमनच्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांनी कामगार दिनानिमित्त घेतलेली विशेष मुलाखत

संकटाच्या काळात कामगारांना आधार देणारं SHRAMECO Application
X

आज कामगार दिन, सध्या कोरोना काळात कामगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशा परिस्थितीत सरकारला जेव्हा असंघटीत कामगारांच्या संख्येबाबत त्यांच्या सद्यस्थितीबाबत आपण प्रश्न करतो. तेव्हा त्यांच्याकडे या असंघटीत कामगारांची एकूण आकडेवारी देखील आपल्याला मिळत नाही.

त्यामुळं अशा कामगारांची संपुर्ण माहिती एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम विकास औटे, या नव उद्योजकाने केलं आहे.

SHRAMECO या कंपनीने एक अपलिकेशन लॉन्च केलं आहे. हे Application कामगार (एम्प्लॉयी) आणि नियोक्ता (एम्प्लॉयर) यांच्यातील दुवा म्हणून, कामगार व शासन यांच्यातील दुवा म्हणून, कामगारांसाठी रोजगार, कौशल्य विकास,समाज कल्याण, शासकीय योजना व फायदे यासाठी काम करणार आहे.

आज श्रमिकोकडे ८,००० हून अधिक कामगारांनी नोंद केली आहे. उद्योजक विकास औटे यांनी मुंबईतील विविध ठिकाणच्या विविध प्रकारच्या कामगारांशी प्रत्यक्ष भेटी घेऊन, अडचणी समजून घेऊन, कामगारांचा रोजचा दिनक्रम समजून घेऊन हे application तयार केलं आहे.

विकास यांनी कोरोनाच्या कठीण काळात लागणारी काही अदयावत तंत्रज्ञान वापरून क्वारंन्टाइन नागरिकांसाठी, प्रशासनास मदत व्हावी म्हणून कोविगार्ड आणि कोविकेअर हे मोबाइल अँप्लिकेशन्स, व अन्य तंत्रज्ञान तयार केले व प्रशासणाला दिले आहे. हे मोबाइल अँप्लिकेशन्स आणि ऑनलाईन यंत्रणा नवी मुंबई, पनवेल , ठाणे, भिवंडी सह अन्य मोठया महानगरपालिका मध्ये कार्यरत आहे.

सध्या विकास यांनी कामगारांसाठी तयार केलेलं स्टार्टअप नक्की कसं आहे. यासंदर्भात कामगार दिनानिमित्त मॅक्सवूमनच्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांनी विकास औटे यांच्याशी केलली विशेष बातचीत ...


Updated : 1 May 2021 1:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top