Home > News Update > Sharad Pawar: MVA मधून राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? शरद पवारांनी सांगितला आकडा

Sharad Pawar: MVA मधून राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? शरद पवारांनी सांगितला आकडा

Sharad Pawar: MVA मधून राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? शरद पवारांनी सांगितला आकडा
X

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले आहेत त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे कायमसाठी बंद असतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले आहेत. शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकारी, आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्ष सोडून गेलेल्यांना आता पक्षात जागा नाही. तसेच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ७० ते ८० जागा मिळणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, अशा सूचना पवारांनी दिल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे जिल्ह्यात पक्षबांधणीला सुरुवात करा. आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आपल्यालाच काम करायचं आहे. आपणच पक्ष पुढे घेऊन जायचा आहे, अशा सूचना शरद पवार यांनी बैठकीमध्ये दिल्या आहेत. त्यामुळे फुटून बाहेर पडलेल्या नेत्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार गटाची बैठक पार पडली. बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष, खासदार सुप्रीया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते.

Updated : 10 Sep 2023 3:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top