Home > News Update > गौतम अदानींचा उदय कसा झाला?

गौतम अदानींचा उदय कसा झाला?

अदानी समुहाच्या शेअर्सच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. मुकेश अंबानी यांच्यानंतर देशातील श्रीमंत उद्योगपती म्हणून गौतम अदानी यांचे नाव घेतले जाते. पण गौतम अदानी यांचा उदय आणि प्रवास कसा झाला ते पाहूया....

गौतम अदानींचा उदय कसा झाला?
X

20 वर्षांपूर्वी झालेले अपहरण आणि मुंबई हल्ल्यात हॉटेल ताज इथे थोडक्यात वाचलेले गौतम अदानी यांचे नाव सध्या जगभरातील श्रीमंत लोकांमध्ये गणले जाते. कोरोनाच्या विषाणूने संपूर्ण देशाला मंदीच्या खाईत ढकललेले असताना अदानी समुह मात्र प्रगती करत होता. अदानी समुहाने जागतिक पातळीवरील भागीदार आणि गुंतवणूक मिळवली. त्याचबरोबर नवनवीन क्षेत्रात काम सुरू केले. खाणी, गॅस आणि बंदरांच्या क्षेत्रातील अदानी समुहाच्या फर्मच्या शेअर्सच्या किंमती झपाट्याने वाढत गेल्या. द प्रिंटने गेल्यावर्षी दिलेल्या वृत्तानुसार अदानी यांची संपत्ती 32 अब्ज डॉलर एवढी आहे आणि भारतात मुकेश अंबानी यांच्यानंतर अदानी हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. गेल्यावर्षी अंबानी यांच्या कंपन्यांच्या शेअरपेक्षा अदानींच्य़ा शेअर्सच्या किंमतीत वाढ झाली.

24 जून 1962 ला अहमदाबाद येथे गौतम अदाना यांचा जन्म झाला. 1988मध्ये अदानी एन्टरप्रायजेस लि. सुरू करण्याआधी कॉलेज शिक्षण सोडल्यानंतर अदानी यांनी 1980 मध्ये मुंबईतल्या हिरे उद्योगात काम करण्यास सुरूवात केली. पण लवकरच भावाच्या प्लास्टिकच्या व्यवसायात मदतीसाठी ते आपल्य़ा राज्यात म्हणजे गुजरातमध्ये परतले. 20 वर्षांनंतर त्यांनी अरबी समुद्राच्या किनारी असलेले मुंद्रा बंदर विकसित करण्याचे काम हाती घेतले. यातूनच त्यांची कंपनी देशातील बंदरांचा विकास करणारी सगळ्यात मोठी कंपनी बनली. एवढेच नाही तर त्यांचा उद्योग समूह देशातील सगळ्यात मोठा ऊर्जा निर्मिती करणारा उद्योगही ठरलाय. एवढेच नाही तर खाणींच्या व्यवसायातही अदानी समूह सर्वात पुढे आहे. ऑस्ट्रेलियामध्येही अदानी समुहाने ऊर्जा प्रकल्पाचे काम मिळवले आहे, पण सध्या या प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांचा मोठा विरोध होतो आहे. पीव्हीसी पाईपच्या निर्यातीने आंतरराष्ट्रीय बाजारात अदानी उद्योग समूहाने पाऊल टाकले. अदानी समुहाच्या 6 कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आङेत. आता अदानी हे आंतरराष्ट्रीय बंदर विकासाच्या क्षेत्रातही कार्यरत आहेत.

अदानी समुहाच्या वेगवेगळ्या 15 क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक असल्याचे अदानी समुहाला लाभ झाला असाही आऱोप विरोधकांकडून केला जातो.

Updated : 15 Jun 2021 11:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top