Home > News Update > एकनाथ खडेंसना वारंवार कोरोना कसा होतो?- गिरीश महाजन

एकनाथ खडेंसना वारंवार कोरोना कसा होतो?- गिरीश महाजन

एकनाथ खडेंसना वारंवार कोरोना कसा होतो?- गिरीश महाजन
X

भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते सध्या क्वारंटाईन आहेत. पण एकनाथ खडसे यांना दोन महिन्यात पुन्हा कोरोनाची लागण झाल्याने हा चिंतेचा विषय आहे आणि यावर संशोधन झाले पाहिजे असा टोला भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

एकनाथ खडसे यांनी नोव्हेंबरमध्ये ट्विट करुन कोरोना झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ईडीच्या चौकशीच्या दिवशी आपल्याला कोरोना सदृश लक्षणं जाणवत असल्याने डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे, असे सांगत खडसे १४ दिवस क्वारंटाईन जाले होते. तर आता १८ फेब्रुवारी रोजी पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी ट्विट करुन सांगितले आहे.


Updated : 20 Feb 2021 12:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top