Home > News Update > बालेवाडीत अपहरण झालेला ४ वर्षीय 'डुग्गू' सुखरूप, कसा सापडला डुग्गू..वाचा

बालेवाडीत अपहरण झालेला ४ वर्षीय 'डुग्गू' सुखरूप, कसा सापडला डुग्गू..वाचा

पुणे शहरातील बालेवाडी हायस्ट्रीटवरून 11 जानेवारी रोजी डुग्गू नावाच्या चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्या मुलाच्या वडिलांनी अपहरणकर्त्याला मागेल ते देण्याची तयारी दाखवली होती. मात्र अखेर अपहरणकर्त्याने बालेवाडीतून अपहरण केलेल्या स्वर्णव सतीश चव्हाण याची सुटका केली आहे. त्यामुळे गेले 7 दिवस सुरू असलेल्या अपहरणाच्या थरारनाट्याचा शेवट झाला.

बालेवाडीत अपहरण झालेला ४ वर्षीय डुग्गू सुखरूप, कसा सापडला डुग्गू..वाचा
X

बालेवाडी येथील हायस्ट्रीटजवळीत पाठशाळा परिसरातून स्वर्णव सतीश चव्हाण नावाच्या चार वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले होते. तर अपहरण कर्त्याने गोड बोलून दुचाकीवरून चिमुकल्याचे अपहरण केले होते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. मात्र मुलाचे अपहरण झाल्यानंतर आईवडिलांनी टाहो फोडला होता.

स्वर्णव सतीश चव्हाण उर्फ डुग्गू 11 जानेवारीला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शाळेला जात होता. त्यावेळी दुचाकीवरून एका व्यक्तीने डुग्गूचे अपहरण केले. त्यानंतर आठ दिवस उलटून गेले तरी अपहरणकर्त्याने खंडणीसाठी फोन न केल्याने डुग्गूच्या आईबापाचं काळीज तुटत होतं. तर पोलिसांना तपासात कोणतेही धागेदोरे हाती लागत नव्हते.

अखेर डॉ. सतीश चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काळजाच्या तुकड्याला सोडवण्यासाठी अपहरणकर्त्याला मागेल ते देण्याची घोषणा केली. होती. तर मुलाच्या बापाने म्हटले होते की, माझा मुलगा शारिरीकदृष्ट्या किरकोळ आहे. तो लगेच आजारी पडतो. त्यामुळे जर त्याला ताप किंवा खोकला आला तर कोणते औषध द्यावे, हे सुध्दा त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लिहीले होते. तर तुम्हाला हवे तितके पैसे घ्या, पण माझ्या मुलाला सोडा, अशी विनवणी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. मात्र त्यानंतरही डुग्गूचा पत्ता लागत नव्हता.

अखेर दोन दिवसांपुर्वी एका व्यक्तीच्या गाडीवर स्वर्णिव फिरताना दिसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी 22 पथके स्थापन करत शहरातील नाकाबंदी केली. त्यानंतर अपहरणकर्त्याने बुधवारी दुपारी 1 वाजता लोटस हॉस्पिटल, पुनवळे येथील एका सोसायटीच्या गेटवर दादाराव जाधव नावाच्या वॉचमनकडे सोडले. त्यानंतर अपहरणकर्ता फरार झाला.

दादाराव यांच्याकडे सोडल्यानंतर डुग्गू भेदरलेला होता. त्याने वडील सतीश चव्हाण यांना फोन लावण्यास सांगितले. मात्र डिग्गूला फोन नंबर सांगता येत नव्हता. मात्र त्याच्या बॅगवर असलेल्या नंबरवर फोन केला. त्यानंतर व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून स्वर्णिवची ओळख पटली. त्यानंतर त्याचे आई वडिल पुणे पोलिसांसह तेथे दाखल झाले. त्यांनी चिमुकल्या डिग्गूला ताब्यात घेतले. तर त्यानंतर वॉचमन असलेल्या जाधव यांच्याकडे चौकशी केली असता अपहरणकर्त्याने तोंड लपवला होता, असे म्हटले.

याबाबत पुणे पोलिसांनी ट्वीटरवरून अधिकृत माहिती दिली. तर त्यामध्ये म्हटले आहे की, बालेवाडी येथील हाय स्ट्रीटवरून अपहरण झालेला लहान मुलगा सापडला आहे. त्याची तब्बेत चांगली आहे.

Updated : 19 Jan 2022 1:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top