Top
Home > News Update > कशी होते फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी ?

कशी होते फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी ?

कशी होते फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी ?
X

संपुर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणात चार आरोपींना २२ जानेवारीला फासावर चढवलं जाणार आहे. एकाच वेळी चौघांना फाशी दिली जाणार आहे.फाशीसाठी सकाळची वेळ का निवडली जाते? फाशी देण्यापुर्वी आरोपीची इच्छा पुर्ण केली जाते? फाशी देतांना कोण ,कोण उपस्थित राहतात? प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून जाणून घेवूयात

फाशीसाठी सकाळची वेळ का?

कारागृहातील सर्व काम सुर्योदयानंतर सुरु होतात. सकाळी फाशी दिल्यास तुरुंगातील इतर कामांवर परिणाम होणार नाही. ते सुरळीतपणे सुरु राहावेत म्हणून फाशीसाठी सकाळची वेळ निवडली जाते.

फाशीपुर्वी जल्लाद काय बोलतात?

फाशी देण्यापुर्वी ‘मला माफ करा’ असं जल्लाद म्हणतात. आरोपी हिंदू असल्यास त्याला राम-राम तर मुस्लीम आरोपी असल्यास ‘सलाम’ केला जातो. आम्ही काहीचं करु शकत नाही, कारण आम्ही हुकुमाचे ताबेदार आहोत, असं जल्लाद फाशी देण्यापुर्वी म्हणतो.

मृतदेहाला किती वेळ फासावर ठेवतात?

याचा निश्चित वेळ ठरलेला नसतो. मात्र फाशी दिल्यानंतर साधारणपणे आरोपीला १० मिनीटे फासावर ठेवलं जात. १० मिनीटानंतर डॉक्टर मृतदेहाचं निरीक्षण करतात. मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा करतात.१० मिनीटे फास आवळल्यानंतरही आरोपींचा मृत्यु झाला नसल्याच्या काही घटना घडल्यात.

फाशीच्या वेळी कोण कोण उपस्थित असतं?

फाशी देतांना न्याय दंडाधिकारी, कारागृह अधिक्षक आणि जल्लाद यांची उपस्थिती महत्वाची आहे. यापैकी एकजण उपस्थित नसल्यासं फाशीच्या शिक्षेची अमंलबजावणी होवू शकत नाही. याशिवाय डॉक्टर उपस्थित असतो.

फाशी सुनावल्यानंतर न्यायाधीश पेनची निब तोडतात?

फाशीची शिक्षा देणे म्हणजे जीव घेण्यासारखं आहे. एकदा निर्णय दिल्यानंतर फाशी रद्द होवू शकत नाही. त्यामुळे फाशीचा निर्णय़ देतांना वापरलेल्या पेनाची निब तोडतात. त्या पेनाचा दुसऱ्यांदा वापर होत नाही.

फाशी देण्यापुर्वी आरोपीला शेवटची इच्छा विचारली जाते?

फाशी देण्यापुर्वी कारागृह प्रशासनं आरोपीला शेवटची इच्छा विचारते. यामध्ये नियमावली ठरलेली आहे. यात घरच्यांना भेटणे, धर्म ग्रंथाचं वाचन करणे, स्पेशल आणि आवडती डिश खान्याची इच्छा याचा समावेश असतो. नियमावलीच्या बाहेरील इच्छा व्यक्त केल्यासं त्या फेटाळल्या जातात.

Updated : 7 Jan 2020 3:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top