Home > News Update > मोस्ट वॉन्टेड मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

मोस्ट वॉन्टेड मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

मोस्ट वॉन्टेड मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
X

धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती कोटगुल जंगल परिसरात झालेल्या पोलीस आणि नक्षल चकमकीत 26 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलाला यश मिळाले आहे. हे पोलिस दलाचं मोठं यश मानलं जात आहे. आज या संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले 'मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे चकमकीत ठार झाला. हे गडचिरोली पोलिसांचं अभूतपूर्व यश आहे. तेलतुंबडे याचा खात्मा झाल्याने महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा राज्यात शांती निर्माण होऊन या राज्याचा विकास वेगाने होईल,' असा दावा गृहमंत्र्यांनी यावेळी केला आहे.

गडचिरोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी संवाद साधत होते. मिलिंद तेलतुंबडे हा केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशासाठी मोस्ट वॉन्टेड नक्षली होता. त्यामुळे मोस्ट तेलतुंबडेचा खात्मा म्हणजे हे गडचिरोली पोलीस दलाचे अभूतपूर्व यश आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती कोटगुल जंगल परिसरात नक्षल्यांच्या हालचाली असलेल्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या परिसरात नक्षल विरोधी अभियान तीव्र केले होते. या दरम्यान दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस दलावर गोळीबार केला होता. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत पोलिसांनी गोळीबार केला. या चकमकीत 26 नक्षल्यांच्या खात्मा करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश मिळाले आहे

Updated : 15 Nov 2021 1:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top