Home > News Update > गृहमंत्र्यांच्या रामदास आठवलेंना काव्यमय शुभेच्छा

गृहमंत्र्यांच्या रामदास आठवलेंना काव्यमय शुभेच्छा

गृहमंत्र्यांच्या रामदास आठवलेंना काव्यमय शुभेच्छा
X

गृहमंत्र्याच्या रामदास आठवलेंना काव्यमय शुभेच्छाआपल्या काव्यमय भाषणासाठी प्रसिध्द असलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काव्यमय शुभेच्छा दिल्या आहे. विशेष म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अनिल देशमुखांनी कोरोना प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचेही महत्व पटवून दिले आहे.

कवीमनाच्या आठवलेंना गृहमंत्री देशमुखांनी दिलेली काव्यमय शुभेच्छा सोशलमिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी
बाहेर फिरू नका रात्री,कारण आहे संचारबंदी

पण आज दिवस आहे जल्लोषाचा
कारण वाढदिवस आहे भारी कवीचा

युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग
आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग
आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

- कवी अनिल देशमुख गृहमंत्री महाराष्ट्र राज्य


Updated : 25 Dec 2020 11:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top