Home > News Update > कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गप्प का?

कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गप्प का?

कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गप्प का?
X

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी प्रवरानगर आणि रविवारी पुणे इथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुणगौरव करत अभिवादन केले. पण भाजपशासित कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, त्याबद्दल अमित शाह यांनी एक शब्दही उच्चारलेला नाही. अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात रविवारी महानगर पालिकेच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळासुद्धा पार पडला.

यावेळी अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही, अशी टीका शाह यांनी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केले, गरीब, मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राज्यघटनेच्या माध्यमातून संकल्प केला. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जिवंत असताना आणि त्यांच्या मृत्यूनंतर देखील अपमानित करण्याचे काम काँग्रेसने केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना यांना काँग्रेसतर सरकार आल्यावरच भारतरत्न मिळाले अशी टीकाही त्यांनी केली.

Updated : 19 Dec 2021 1:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top