परबमीर सिंग यांच्यावरील आरोपांच्या चौकशीला गृहविभागाची परवानगी
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  28 April 2021 8:01 AM IST
X
X
मुंबईचे माजी पोलीस आय़ुक्त परबमीर सिंग यांच्यावर निलंबित पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीला राज्याच्या गृहखात्याने परवानगी दिली आहे. परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरणात पोलीस आयुक्त पदावरुन हटवून दुसरीकडे बदली करण्यात आली होती.
त्यानंतर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप केला. पण त्याचवेळी गावदेवी पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी 2 फेब्रवारी 2021 रोजी परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाराचे आरोप करत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिले आहेत. यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे.
 Updated : 28 April 2021 8:01 AM IST
Tags:          parambir singh   anil deshmukh   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






