Home > News Update > हिंगणघाट : पीडित प्राध्यापिकेची प्रकृती गंभीर

हिंगणघाट : पीडित प्राध्यापिकेची प्रकृती गंभीर

हिंगणघाट : पीडित प्राध्यापिकेची प्रकृती गंभीर
X

हिंगणघाटमध्ये पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलेल्या प्राध्यापिकेचा अजूनही जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

  • श्वसनलिकेला इजा झाल्यानं श्वास घेण्यास त्रास
  • कृत्रिम पाईप टाकून डॉक्टरांनी तिचा श्वासोच्छवास पुन्हा सुरू केलाय
  • अन्न नलिकेला गंभीर इजा झाल्यानं बाहेरुन प्रोटीन देणात समस्या
  • डोळ्याला गंभीर दुखापत
  • संपूर्ण चेहरा, डावा हात पूर्णपणे होरपळला आहे
  • त्वचेचं इन्फेक्शन होऊ नये यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न
  • २ डॉक्टर, ७ नर्सची एक टीम २४ तास लक्ष ठेवून
  • पीडितेवर उपचार करण्यासाठी स्पेशल वार्ड
  • प्लॅस्टिक सर्जरी करावी लागण्याची गरज
  • उपचारासाठी राज्यसरकारतर्फे आतापर्यंत ४ लाखांची मदत, उर्वरीत निधीही देणार
  • मनौधैर्य योजनेतून पीडितेला मदत केली जाणार
  • घटनेच्या निषेधार्थ वर्धा जिल्ह्यात पुकारलेला बंद १०० टक्के यशस्वी
  • आरोपीची पोलीस चौकशी अजूनही सुरु
  • जनतेचा रोष बघता आतापर्यंत आरोपीला विविध ठिकाणी हलवण्यात येतंय
  • आरोपीसोबत दुसरा सहकारी नसल्याचं तपासात स्पष्ट होतंय
  • पोलिसांनी ११ प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेतले
  • सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुरु
  • महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार जोगेंद्र कवाडे आणि विद्या चव्हाण यांनी रुग्णालयात जाऊन पीडितेची विचारपूस केली.

Updated : 6 Feb 2020 3:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top