Home > News Update > राज ठाकरे यांच्या द्वेषाला उत्तर, मशिदीसाठी हिंदू बांधवांचे भोंगा गिफ्ट़

राज ठाकरे यांच्या द्वेषाला उत्तर, मशिदीसाठी हिंदू बांधवांचे भोंगा गिफ्ट़

राज्यात भोंग्यावरून राजकारण तापले आहे. तर राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढले नाही तर मशिदींसमोर हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान बुलढाणा येथे नागरिकांनी राज ठाकरे यांच्या द्वेषाला उत्तर दिले आहे.

राज ठाकरे यांच्या द्वेषाला उत्तर, मशिदीसाठी हिंदू बांधवांचे भोंगा गिफ्ट़
X

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर मशिदींसमोर हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ ट्वीट करत भोंगे उतरवण्याचे आवाहन केले आहे. मात्र या भोंग्यांच्या राजकारणात बुलढाणा जिल्ह्यातील केळवद येथील नागरिकांनी राज ठाकरे यांच्या द्वेषाला नाकारले आहे. तर मशिदीसाठी हिंदू नागरिकांनी भोंगा गिफ्ट दिला आहे.

राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत बोलताना अत्यंत प्रक्षोभक भाषण करत चिथावणी दिली होती. त्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडणार का? अशी चर्चा होती. मात्र राज ठाकरे यांनी केलेल्या द्वेषपुर्ण वक्तव्याला बुलढाणा जिल्ह्यातील केळवद येथील नागरिकांनी उत्तर दिले आहे. त्यात नागरिकांनी राज ठाकरे यांच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्याला चांगलीच चपराक लगावत हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले आहे.

रमजान ईदच्या निमीत्ताने ग्रामस्थाने धार्मिक द्वेषाला फाटा देत गावात मशीद नसल्याने शेजारच्या किन्होळा या गावातील मुस्लिम बांधवांना बोलावून ईदच्या शुभेच्छा देत भोंगा भेट दिला. त्यामुळे या अनोख्या हिंदू मुस्लिम ऐक्याची राज्यात चर्चा रंगली आहे.

केळवद हे गाव पुरोगामी विचारांचे गाव म्हणून ओळखले जाते. तर या गावातून क्रांतीसिंह नाना पाटील यांनी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. तसेच इंग्रजांच्या विरोधातील चळवळ याच गावातून पुढे चालली. त्यामुळे केळवद शेती आणि विचारांनी प्रगत असलेले गाव मानले जाते. मात्र या गावाने हिंदू मुस्लिम ऐक्याची अनोखी मशाल पेटवल्याच्या प्रतिक्रीया राज्यभरातून व्यक्त केल्या जात आहेत.


Updated : 4 May 2022 6:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top