Home > News Update > हिंडेनबर्गचा अहवालसमोर अदानीची उडाली दाणादान , गुंतवणुकदारावर कंगाल होण्याची वेळ

हिंडेनबर्गचा अहवालसमोर अदानीची उडाली दाणादान , गुंतवणुकदारावर कंगाल होण्याची वेळ

हिंडेनबर्गचा अहवालसमोर अदानीची उडाली दाणादान , गुंतवणुकदारावर कंगाल होण्याची वेळ
X

हिंडेनबर्गचा संशोधन अहवाल समोर आल्यावर अदानी समुहाच्या कंपनीतील शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळायली.त्यामुळे अदानी समुहाच्या कंपनीत गुंतवणुक केलेल्या गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे.

हिंडेनबर्गचा संशोधन अहवालसमोर आल्यानंतर अदानी समुहाची आर्थिक पडजळ सुरु झाली .उद्योगपती गौतम अदानी यांच्या सात सुचीबध्द कंपन्यानी पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे ८६ अब्ज डॅालरचे नुकसान झाले आहे. गेल्या आठव़ड्यापासुन अदानी समुहाच्या कंपनीमध्ये जोरदार विक्री होत आहे, अदानी समुहातील प्रमुख कंपनी असणाऱ्या अदानी एंटरप्रायझेसचे मागील काही दिवसात २७ टक्कापर्यत शेअर्स पडले आहेत .या कंपनीचा शेअर्स ७९४ रुपयांनी कोसळले आहेत.

शेअर्स मार्कैट मध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्या सात कंपनाच्या मार्कैट मॅप मध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अदानी समुहाची कंपनी असणाऱ्या अदानी पॉवरचा शेअर्स २७० रुपयावरुन २१२ रुपयावर घसरला आहे .अदानी समुहातील अदानी पॉवरचे गेल्या पाच सत्राच्या ट्रेड मध्ये २२ टक्क्यापर्यत घसरला आहे. अदानी टोटल गॅसच्या दरात ५१ टक्कापर्यत घसरण पाहायला मिळत आहे. अदानी टोटल गॅसच्या शेअर्स ३८५४ वरुन १८९८ रुपयांच्या पातळीपर्यत घसरले .

अदानी एंटरप्रायझेसने २० हजार कोटी एफपीओ आणला परंतु बुधवारी तो मागे घेण्यात आला . अदानी एंटरप्रायझेसने शेअर्स ३६ टक्क्यानी घसरले आहेत .अदानी एंटरप्रायझेसन शेअर्स चा भाव ३४०० रुपयावरुन २१८० रुपयावर घसरला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन य़ा अदानी समुहाच्या कंपनीचे शेअर्स पाच दिवसात २३२ रुपयांनी घसरला आहे. अदानी पोर्ट्सचे शेअर्स ७३६ वरुन ५०० पर्यत घसरले आहेत. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स ३९ टक्क्यापर्यत घसरले असुन ११६० रुपयावर आले आहेत .अदानी समूहाची FMCG कंपनी अदानी विल्मर लिमिटेडचे शेअर्स गेल्या पाच दिवसात २२ टक्क्यानी घसरले असुन २२१ रुपयावर व्यवहार करीत आहे. अदानी विल्मारच्या शेअर्सची किंमत ५६५ रुपयांच्या वरुन ४४३ रुपयावर आली आहे. अदानी पॉवर लिमिटेडच्या शेअर्सची किंमत २७० रुपयांवर होती ती आता २१२ रुपयावर आली आहे.

Updated : 2 Feb 2023 2:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top