Home > News Update > संगमेश्वरमधल्या कोळंबे आंबेकरवाडीत डोंगर खचतोय, वेळीच उपाययोजनांची गरज

संगमेश्वरमधल्या कोळंबे आंबेकरवाडीत डोंगर खचतोय, वेळीच उपाययोजनांची गरज

संगमेश्वरमधल्या कोळंबे आंबेकरवाडीत डोंगर खचतोय, वेळीच उपाययोजनांची गरज
X

संगमेश्वर :- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या इसाळवाडी इथं दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झालीय. इथल्याही ग्रामस्थांनी २०१५ मध्येच प्रशासनाला या धोक्याची पूर्वकल्पना दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं ही दुर्घटना घडल्याचं आता समोर आलंय. अगदी तशीच परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे-आंबेकरवाडी इथं घडण्याची शक्यता आहे. तलाठ्यानं इथल्या ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटिसा दिलेल्या आहेत. मात्र, पुनर्वसनाची व्यवस्था न झाल्यानं ग्रामस्थ सध्या स्थलांतरीत झालेले नाहीत. त्यामुळं दुर्घटना टाळण्यासाठी आधी इथल्या ग्रामस्थांचं सुरक्षित स्थळी पुनर्वसन करण्याची गरज आहे.

इसाळवाडी दुर्घटनेनंतर रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे आंबेकरवाडीतील ग्रामस्थांमध्ये भूस्खलनामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ग्रामस्थांना दरवर्षी शासनाकडून नोटिसा येतात. मात्र, त्यांनी कायम स्वरूपी कुठे राहायचे याचे नियोजन मात्र शासनाकडून होत नाहीये. दिवसेंदिवस या कोळंबे आंबेकर वाडीतील जमीन खचत असल्यामुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत. सामाजिक कार्यकर्ते युयुस्तु आर्ते, विशाल रापटे, ओंकार लोध, प्रसाद सदलगे, संजय शिंदे यांनी कोळंबे आंबेकरवाडीला भेट दिली असता वाडीतील संदेश चव्हाण आणि पांडुरंग चव्हाण इतर ग्रामस्थांनी भूस्खलन होत असल्याचं सांगितले.

या गावाला दरवर्षी शासनाकडून ग्रामस्थांना स्थलांतरित होण्यासंदर्भात नोटिसा बजावतं असते. मात्र, "आम्ही स्थलांतरित व्हायला तयार आहोत पण शासनच पुढाकार घ्यायला तयार नाही. आमची 11 घरे 26 कुटुंबे आहेत. अशा वेळी तात्काळ आमचे पुनर्वसन करा" अशी मागणी कोळंबे आंबेकरवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे. रायगड जिल्ह्यातीस इसाळगडवाडीतील घटनेची पुनरावृत्ती कोळंबे आंबेकरवाडी होऊ नये त्यांसाठी प्रशासन काय पावलं उचलणार आहेत हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.






Updated : 25 July 2023 8:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top