देशात आतापर्यंत १ लाख १९ हजार रुग्ण कोरोनामुक्त

India corona update

देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे तब्बल ९ हजार ९७१ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात कोरोनाच्या २८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवीन रुग्ण संख्येमुळे देशात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २ लाख ४६ हजार ६२८ झाली आहे. पण यातील १ लाख १९ हजार २९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

तर ६ हजार ९२९ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने सध्या देशातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २० हजार ४०६ झाली आहे. गेल्या २४ तासात देशात १ लाख ४६ हजार ६९ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असल्याची माहिती ICMR ने दिली आहे.