Home > News Update > सोन्याचा उच्चांक : 70 हजार प्रति तोळा जाणार ?

सोन्याचा उच्चांक : 70 हजार प्रति तोळा जाणार ?

सोन्याचा उच्चांक : 70 हजार प्रति तोळा जाणार ?
X

रोज दिवसागणिक सोन्याच्या भावात नवा उच्चांक पहायला मिळत आहे. काल सोन्याने झळाळी घेत दिवसभरात 1200 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे नवा विक्रमी टप्पा गाठत प्रती तोळ्याचे दर 67,300 रुपयांवर पोहचला आहे जीएसटीसह GST 69, 300 रुपये वर पोहोचले आहे. चांदीच्या दरातही १ हजारांची वाढ झाली आहे.चांदी प्रति किलो 76000 रु. पोहचली आहे.

अमेरिकन फेडरल बँकेच्या दोन दिवसीय बैठकीत आगामी जून-जुलैत व्याजदरात कपात करण्याबाबतच्या संकेत देण्यात आले यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांनी खरेदी वाढवल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याचे सोने जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या बुधवारी 100 रुपयांची वाढ होत सोन्याने 66,100 प्रति तोळा हा नवा उच्चांकी दर गाठला होता. तो मोडीत काढत गुरुवारी तब्बल 1200 रुपयांची वाढ होऊन सोने 67, 300 रुपयांवर जाऊन पोहचले आहे.

येत्या काहीच दिवसात सोने भावात आणखीन वाढ होण्याचा अंदाज सोने जानकारांनी दिला आहे. 70,000 रुपये प्रति तोळा सोने जाऊ शकत असं जळगाव येथील सराफा बाजारातील जाणकारांनी दिला आहे.

एन लग्न सराईत सोने भावात विक्रमी वाढ होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Updated : 22 March 2024 5:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top