Home > News Update > Phone Tapping : रश्मी शुक्ला यांना दणका, FIR रद्द करण्याची मागणी फेटाळली

Phone Tapping : रश्मी शुक्ला यांना दणका, FIR रद्द करण्याची मागणी फेटाळली

Phone Tapping :  रश्मी शुक्ला यांना दणका, FIR रद्द करण्याची मागणी फेटाळली
X

राज्यात गाजलेल्या फोन टॅपिंग आणि डाटा लिक प्रकरणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. फोन टॅपिंग आणि डाटा लिक प्रकरणी राज्य सरकारने अज्ञात व्यक्तींविरोधात FIR दाखल केलेला आहे. हा FIR रद्द करण्याची मागणी करणारी याचिका रश्मी शुक्ला यांनी दाखल केली होती. पण मुंबई हायकोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने यासंदर्भात निर्णय दिला आहे.

फोन टॅपिंग आणि डाटा लिक प्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल केलेला FIR रद्द करावा आणि हे प्रकरण CBI कडे सोपवावे अशी मागणी रश्मी शुक्ला यांनी आपल्या याचिकेमध्ये केली होती. सध्या सीबीआय अनिल देशमुख यांचे प्रकरण हाताळत आहे. हायकोर्टाने रश्मी शुक्ला यांना दणका देत मुंबई पोलिसांना सूचनाही केली आहे. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात या प्रकरणात पोलिसांना कोणतीही कारवाई करायची असेल तर त्यांना पूर्वसूचना देण्यात यावी, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

2020 मध्ये रश्मी शुक्ला ह्या राज्याच्या गुप्तहेर विभागाच्या प्रमुख होत्या. त्या काळात पोलीस बदल्यांमध्ये आणि नियुक्त्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या संशयावरुन काही दलाल आणि राजकारण्यांच्या फोनचे टॅपिंग करण्यात आले होते. याचा एक अहवाल रश्मी शुक्ला यांनी तयार केला आणि आपल्या वरिष्ठांना सोपवला होता. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्च २०२० मध्ये वृत्त वाहिन्यांवर या रिपोर्टची माहिती देत सरकारवर गंभीर आरोप केले होते. रश्मी शुक्ला यांनी हा रिपोर्ट लीक केला असा आरोप सत्ताधारी पक्षांनी केला आहे. याच संदर्भात तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी FIR दाखल केला आहे.


Updated : 15 Dec 2021 12:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top