Home > News Update > Pornography Case : Porn व्हिडिओ प्रकरणी राज कुंद्रा याला धक्का

Pornography Case : Porn व्हिडिओ प्रकरणी राज कुंद्रा याला धक्का

Pornography Case : Porn व्हिडिओ प्रकरणी राज कुंद्रा याला धक्का
X

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला Porn व्हिडिओ प्रकरणी मोठा धक्का बसला आहे. मुंबई हायकोर्टाने राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार रियान थोरपे यांचे जामीनअर्ज फेटाळले आहे. न्यायदंडाधिकारी कोर्टाने राज कुंद्रा आणि रियान यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. पण या दोघांनी हायकोर्टात या निर्णयाला आव्हान दिले होते. पण कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली कोठडी कायद्याच्या कक्षेत राहूनच सुनावली गेली आहे, असे सांगत हायकोर्टाने या दोघांची याचिका फेटाळून लावली आहे. राज कुंद्रा आणि रियायान यांनी सुरूवातीला आपल्या अटकेला आव्हान दिले होते.

पोलिसांनी केवळ चौकशीसाठी बोलावले आणि त्यानंतर अटकेची कारवाई केली, असा युक्तीवाद राज कुंद्राने कोर्टात केला होता. तर रियान थोरपे याने आपण चौकशीत सहकार्य केले तसेच पोलिसांची नोटीस स्वीकारुनही आपल्याला अटक केली गेली असे म्हटले होते. पण कोर्टाने या दोघांचे जामीनअर्ज फेटाळले आहेत. राज कुंद्राला १९ जुलै रोजी अटक झाली होती. पुरावे नष्ट केले जात असताना तपास अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही, असा दावा पोलिसांतर्फे कोर्टात करण्यात आला.

Updated : 7 Aug 2021 10:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top