Home > News Update > NawabMalik मालिकांना थांबवा: हायकोर्टाचा याचिकेवर तातडीने सुनावणीस नकार

NawabMalik मालिकांना थांबवा: हायकोर्टाचा याचिकेवर तातडीने सुनावणीस नकार

NawabMalik मालिकांना थांबवा: हायकोर्टाचा याचिकेवर तातडीने सुनावणीस नकार
X

एनसीबी चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि एनसीसीबी विरोधात रोज बोलण्यापासून रोखावे, अशी मागणी करणारी याचिका तातडीने सुनावणी घेण्यास आज हायकोर्टाने नकार दिला.

व्यापारी मौलाना यांनी त्यासंदर्भातलील जनहित याचिका तातडीच्या सुनावणीसाठी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि एम एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सादर केली होती. तुम्ही दिवाळी नंतर या किंवा सुट्टी कालीन न्याय पीठापुढे जा, असा सल्ला उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याने दिला.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा क्रूज वरील रेव्ह पार्टी मध्ये पकडल्यानंतर गेल्या काही दिवसापासून आर्थर रोड तुरुंगात आहे .उच्च न्यायालयात त्याच्या जामीनावर सुनावणी सुरू आहे. अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक रोज पत्रकार परिषद घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून नवे नवे पुरावे देऊन या प्रकरणात खळबळ उडवून देत आहे. त्यात प्रामुख्याने त्यांनी एन सी बी चे डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष केले आहे.

हायकोर्टात आज सुनावणी

आर्यन खान ट्रक केस प्रकरणी जामिनासाठी कालपासून उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून आज्या सोनवणे चा दुसरा दिवस आहे इतर याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा प्रतिवाद आणि एनसीबी चे वकील अनिल सिंह यांच्या प्रति वादानंतर न्यायमूर्ती साखरे आर्यन खान ला बेल देणार की जेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 27 Oct 2021 9:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top