Home > Election 2020 > प्रज्ञा सिंहच्या वक्तव्यानंतर शहीद करकरेंच्या मुलीचे भावनिक उद्गार

प्रज्ञा सिंहच्या वक्तव्यानंतर शहीद करकरेंच्या मुलीचे भावनिक उद्गार

प्रज्ञा सिंहच्या वक्तव्यानंतर शहीद करकरेंच्या मुलीचे भावनिक उद्गार
X

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याबाबत संतापजनक वक्तव्य केल्यानंतर देशात संताप व्यक्त केला जात आहे. प्रज्ञा सिंहच्या या विधानानंतर आता त्यांची मुलगी जुई नवरे यांनी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.


जुईचे भावनिक उद्गार

'हेमंत करकरे त्यांच्या शेवटच्या क्षणीही हे शहर आणि हा देश वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्यासाठी स्वत:च्या जीवापेक्षा आणि परिवारापेक्षाही वर्दी जास्त प्रिय होती, याची प्रत्येकानं आठवण ठेवावी.’

काय म्हणाल्या होत्या प्रज्ञा सिंह ?

‘हेमंत करकरे यांनी मला खूप त्रास दिला. मला शिवीगाळ केली. मला बॉम्बस्फोट कटात गोवले. सुरक्षा आयोगाचा सदस्य असलेल्या एका चौकशी अधिकाऱ्यानं मला सोडण्याचे आदेश त्यांना दिले होते. मात्र, करकरे मला अडकवण्यावर ठाम होते. काहीही करून पुरावे गोळा करेन. पण तुला सोडणार ना ही, असं करकरे म्हणाले होते. 'करकरे हे कुटिलतेनं वागत होते. ते देशद्रोही, धर्मद्रोही होते,’ असं साध्वी म्हणाल्या. 'करकरेंचा वंशनाश होईल असा शाप मी दिला होता. ज्या दिवशी मी जेलमध्ये गेले, तेव्हा त्यांच्या घरी सुतक सुरू झालं होतं. दहशतवाद्यांनी त्यांना मारल्यानंतर ते सुतक दूर झालं,’ असं धक्कादायक वक्तव्य प्रज्ञा यांनी केलं होतं.

Updated : 28 April 2019 5:48 AM GMT
Next Story
Share it
Top