Home > News Update > तुम्ही नयनासाठी खिशात हात घालाल का?

तुम्ही नयनासाठी खिशात हात घालाल का?

तुम्ही नयनासाठी खिशात हात घालाल का?
X

जळगाव शहरात एका खासगी रुग्णालयात नयना पाटील यांच्या फुफ्फुसात न्युमोनिया झाल्याची घटना समोर आल्यानं नयनाची आता जगण्या मरण्याशी झूंज सुरु आहे. नयनाच्या फुफ्फुसात संसर्ग वाढल्याने त्यांना इकमो थेरपी शिवाय पर्याय नसल्याने त्यांना एअर अॅब्युलन्सच्या साहाय्याने हैदराबाद येथे उपचारासाठी हलवण्यात आलंय, नयना यांच्यावर सध्या हैद्राबाद येथे उपचार सुरू आहेत. मात्र, नयनावर पुन्हा एकदा उपचारासाठी करोडो रुपयाची गरज आहे.

सुरुवातीला कुटुंबाकडून पैसे जमवून खर्च केला, मात्र, हा खर्च नयनाला हैद्राबादला हलवल्यानंतर वाढला आहे. त्यामुळं नयनाच्या प्रत्येक श्वासासाठी फुलना फुलाची पाकळी म्हणून लोकांनी मदत करण्याचं आवाहन तिच्या कुटुंबियांनी केलं आहे.


नयना विनोद पाटील यांचं (वय ३१) वर्ष आहे. फुफ्फुसात संसर्ग वाढल्याने त्यांना इकमो थेरपी करून पुढील उपचारांसाठी हैदराबादच्या एका खासगी रुग्णालयात अॅम्ब्युलन्सने नेण्यात आले.

नयना विनोद पाटील या आपल्या कुटुंबासह भरुच, गुजरात येथे राहतात. त्यांचे पती विनोद पाटील हे एका खासगी कंपनीत व्यवस्थापक आहेत. त्यांना या अगोदर कोरोनाची लागण झाली होती. संसर्ग वाढत असल्याने त्यांना २२ एप्रिल रोजी जळगावला हलवण्यात आले.

एका खासगी दवाखान्यात दाखल केल्यावर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्याचसोबत फुफ्फुसात संसर्ग अधिकच वाढला. जळगावातील डॉक्टरांनी रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने दुसरीकडे हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, जळगावात त्यांच्यावर इकमो थेरपीने इलाज शक्य नव्हता. त्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद येथील रुग्णालयांमध्ये महिलेच्या नातेवाईकांनी चौकशी सुरू केली. मात्र, त्यांना तेथून प्रतिसाद मिळाला नाही.

काय आहे इकमो मशिन...

इकमो मशीन रुग्णाच्या फुफ्फुसाला मदत करण्यासाठी लावले जाते. त्यामुळे फुफ्फुसावरील ताण कमी होतो. आणि फुफ्फुसात साचलेला कफ काढण्यास वेळ मिळतो आणि मदतही होते. फुफ्फुसाच्या बाजूने लावलेल्या ट्युबमधून रुग्णाला ऑक्सिजन दिला जातो.

अन्य रुग्णालयात शिफ्ट करण्यासाठीही नयना पाटील यांना इकमो मशीन लावावे लागणार होते. राज्यातील कोणत्याही रुग्णालयाने इकमो मशीन येथे पाठवण्यास तयारी दर्शविली नाही.


अखेर हैदराबादच्या एका खासगी रुग्णालयाने एअर अॅम्ब्युलन्स द्वारे त्यांना इकमो मशीन पाठवण्याची तयारी दर्शवली. तसेच हे मशीन त्यांना लावण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. त्यासाठी चार डॉक्टर देखील या रुग्णालयानेच पाठवले. ही शस्त्रक्रिया गुरुवारी दुपारी करण्यात आली. त्यानंतर त्यांना आता एअर अॅम्ब्युलन्सने जळगावहून हैदराबादला नेण्यात आलं आहे. नयना यांना हैद्राबादला नेण्यात आलं असलं तरी नयना यांच्या उपचारासाठी 1 कोटी पेक्षा अधिक खर्च डॉक्टरांनी सांगितला आहे. हा खर्च करण्याची ऐपत नयना यांच्या कुटुंबाची नाही. आज नयनावर जी वेळ आहे. ती उद्या कोणावरही येऊ शकते. त्यामुळं आज आपण आपल्या कुटुंबातील सदस्य समजून नयनाला नक्की मदत करा...

विनोद पाटील ..

HDFC BANK Acc No - 50100190531262

IFSC - HDFCO000255

Gpay, Ppay, Paytm Number 8160144581

Updated : 6 Jun 2021 2:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top