Home > News Update > पूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे- पाटील

पूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे- पाटील

तारळी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे तारळी नदीला पूर आला.या पुरामुळे परिसरात मोठे नुकसान झाले. पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

पूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे- पाटील
X

तारळी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे तारळी नदीला पूर आला. या पुराचे पाणी गावात शिरल्याने दुकानांची तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा. पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

पाली ता. कराड येथील पूर परिस्थितीची पाहणी पालकमंत्री पाटील यांनी केली यावेळी ते बोलत होते.

पूरामुळे पाली येथील पूलाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पुलाची तत्काळ दुरुस्ती करुन पूल वाहतुकीसाठी खुला करावा अशा सूचना पाटील यांनी दिल्या.

गेल्या तीस ते पस्तीस वर्षात पाली येथे झालेला हा सर्वात मोठा पाऊस आहे. पाटण तालुक्यातील विरगाव येथे भूस्खलन झालेल्या गावात बचावकार्य कोयनेच्या बॅकवॉटरमधुन सुरु करण्यात आले आहे. तसेच आंबेघर येथे एनडीआरएफची टीम आज सकाळी पोहोचली असून मदतकार्य सुरु केले आहे. कोयनाधरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. ज्या गावांमध्ये भूस्खलन झाले आहे. त्या गावामध्ये प्रशासनाबरोबर स्वयंसेवी संस्थाही काम करीत असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

Updated : 24 July 2021 9:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top