Home > News Update > औरंगाबाद शहरात ढगफुटी; जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार

औरंगाबाद शहरात ढगफुटी; जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार

औरंगाबाद शहरात ढगफुटी; जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार
X

एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने औरंगाबाद मध्ये पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. तर मध्यरात्री तीन वाजेनंतर शहरात ढगफुटी पाहायला मिळाली. तसेच जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत असल्याचे चित्र आहे.

शाहीन चक्रिवादळ सध्या सक्रिय असुन ओमान च्या आखातात केंद्रित आहे. शुक्रवारी दिवसभर शहरावर आकाश निरभ्र राहिल्याने आर्द्रता घटल्याने कमाल तापमानान सुमारे दोन अंशाची वाढ नोंदवली गेली.शाहीन चक्रिवादळाने निर्माण केलेली वातावरण निर्मीती, परतीचा पाऊस व औरंगाबाद शहरावरील वातावरण बदलाचा एकत्रीत परिणाम आज पहाटे शहरावर झालेल्या जोरदार पावसावर दिसुन आला.पहाटे ०३:२५ वाजता औरंगाबाद शहरावर पावसाला सुरुवात झाली.

तर पहाटे ०३:३८ ते ०४:०३ या पंचवीस मिनीटात विजांचा कडकडाटासह सरासरी ११८ मीली मिटर प्रति तास या ढगफुटीच्या वेगाने शहरात पाऊस पडला आहे.शहरातील एमजीएम जेएनईसी वेधशाळेत या पंचवीस मिनीटात ५१.२ मिमी पावसाची नोंद झाली.त्यामुळे या वर्षी प्रथमच औरंगाबाद शहरावर गेल्या एका महिन्यात तीन वेळेस ढगफुटीच्या वेगाने पावसाने हजेरी लावली आहे.

ग्रामीण भागात रात्रीपासून धो-धो...

औरंगाबादच्या अनेक ग्रामीण भागात सुद्धा रात्रीपासून धो-धो पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी नद्यांना पूर आले आहे. कन्नड, वाळूज,सोयगावसह अनेक भागात पाऊस झाला आहे. तर सोयगाव तालुक्यातील बनोटी हिरवा,तिडका नदीला पूर आले आहे.

शेतकरी पूर्णपणे खचला...

गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीचा फटका सतत मराठवाड्याला बसत असताना आता पुन्हा तिसऱ्या वर्षी सुद्धा अतिवृष्टी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी पूर्णपणे खचला आहे. सरकारची मिळणारी तुटपुंजी मदतीवर कसं जगावे असा प्रश्न आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पडत आहे.

Updated : 2 Oct 2021 2:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top