Home > News Update > चाळीसगाव ढगफुटी; डोंगरी आणि तितुर नदीला पूर, चाळीसगाव शहरात पाणी शिरले

चाळीसगाव ढगफुटी; डोंगरी आणि तितुर नदीला पूर, चाळीसगाव शहरात पाणी शिरले

चाळीसगाव ढगफुटी; डोंगरी आणि तितुर नदीला पूर, चाळीसगाव शहरात पाणी शिरले
X

जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरवात झाली आहे. चाळीसगाव परिसरात पहाटे ढगफुटी झाली असून तितुर आणि डोंगरी नदीला पूर आल्याने 200 पेक्षा जनावरं वाहून गेली आहेत. तर चाळीसगाव शहरातील काही भाग पाण्याखाली गेला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे.

चाळीसगाव तालुक्यात पावसाने थैमान घातल्याने मुंडखेडा, वाकडी, पानगाव, रोकडे, भोरखेडा या गावांना पुराचा वेढा पडला आहे. याच गावातील शेकडो जनावरं वाहून गेली आहेत.

गिरणा नदीच्या जमदा कालव्यातुन पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच पुराचे पाणी गिरणा नदीत वाहत असल्याने गिरणा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षितस्थळी हलवण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

Updated : 31 Aug 2021 4:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top