Home > News Update > Bhandara Hospital fire case: च्या चौकशीसाठी 6 सदस्यीय समितीची घोषणा

Bhandara Hospital fire case: च्या चौकशीसाठी 6 सदस्यीय समितीची घोषणा

भंडारा जळीत कांडाच्या चौकशीसाठी 6 सदस्यीय समितीची घोषणा, किती दिवसात दोषींवर कारवाई होणार? पाहा काय म्हणाले आरोग्य मंत्री राजेश टोपे

Bhandara Hospital fire case: च्या चौकशीसाठी 6 सदस्यीय समितीची घोषणा
X

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज जाहीर केले आहे. बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे टोपे यांनी म्हटलं आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयाला आज दुपारी टोपे यांनी भेट दिली. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम उपस्थित होते.

जिल्हा रुग्णालयातील घटनास्थळाची पाहणी करताना त्यांनी आगीचे नेमके कारण, रुग्णालयाचे फायर एक्स्टींग्विश आणि इतरही सुरक्षात्मक बाबींचे ऑडिट अशा सर्व बाबींची ही समिती चौकशी करेल. या समितीत संबंधित विषयांचे तज्ञ समाविष्ट करण्यात आले आहेत.


स्ट्रक्चरल, फायर आणि एक्स्टींग्विश ऑडिट आणि रुग्णालयात नेमका स्फोट होण्याची कारणांबाबतही ही समिती शासनाला अहवाल सादर करणार आहे.

ही घटना अतिशय दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. मृत पावलेल्या बालकांच्या कुटुंबियांच्या भावना मी समजू शकतो. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ही समिती गठित केली आहे. या घटनेशी संबंधित सर्व संबंधितांची तसेच प्रत्यक्षदर्शींचीही समितीसोबतच पोलिसांकडूनही चौकशी केली जाणार आहे. बेफिकीरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. असं यावेळी टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

बालकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

भोजापूर येथील गीता विश्वनाथ बेहरे यांचे बाळ या घटनेत दगावले आहे. आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.

Updated : 9 Jan 2021 3:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top