Home > News Update > आरोग्य भरती पुन्हा होणार-आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्य भरती पुन्हा होणार-आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्य भरती पुन्हा होणार-आरोग्यमंत्री राजेश टोपे
X

काही दिवसांपूर्वी आरोग्य भरतीच्या परिक्षेचे पेपर फुटल्याची घटना घडली होती.त्याचसंदर्भात (Health minister) आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी (rajesh tope) महत्वाचं विधान केलं आहे.आरोग्य भरतीच्या परिक्षा आता राज्य सरकार पुन्हा घेणार आहे.अस विधान टोपे यांनी केलं.पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी याबाबत चर्चा झाल्याचं ही टोपेंनी सांगितलं. त्यामुळे आरोग्य भरतीच्या दोन्ही परीक्षा आता पुन्हा होणार हे आता स्पष्ट झालंय. आरोग्य भरती संदर्भात विधानसभेत पोलिसांना सखोल चौकशी करण्यासादर्भत आदेश दिले होते. पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे. ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता त्यामुळे आम्ही पुन्हा 'ड' वर्गाची परीक्षा घेणार आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली त्यांचं ही मत लक्षात घेतलं आहे. दोन्ही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेण्याचा मंत्री मंडळाचा निर्णय आहे. त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय यामध्ये झाला आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीबाबत माहिती दिली आहे. कुठेही चौथी लाट असल्याचा माझा सूतोवाच नाही. सध्या छोटी संख्या वाढत आहे. महाराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पाहिली आहे. मुंबई, पुणे,नाशिक,ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली आहे. ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहेत त्या ठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यात रुग्ण गंभीर नाही. जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षण असतील असा अनुमान काढण्याता आला आहे

Updated : 10 May 2022 11:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top