धारावीत ‘संघ दक्ष’, संघाचं नागपुरात दुर्लक्ष

धारावी मध्ये कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. सध्या धारावी कोरोना मुक्ती कडे वाटचाल करत आहे. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने ‘धारावी मॉडेल’ चं कौतुक केलं. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी हे फक्त सरकारचं श्रेय नाही. असं म्हणत आरएसएस RSS सारख्या संघटनांचं देखील श्रेय असल्याचं म्हटलं होतं. यानंतर राज्यात मोठा वाद देखील झाला होता. धारावीत संघाने काम केलं तर डॉक्टरांनी काय केलं? असा सवाल देखील सोशल मीडियावर उपस्थित केला जात होता.

महत्त्वाची बाब म्हणजे धारावी मध्ये कोरोनाला रोखण्याचा दावा करणाऱ्यां संघाच्या स्वयंसेवकासमोर मोठा सवाल निर्माण झाला आहे. त्याचं झालं असं की, प्रभाग नंबर 31 मध्ये संघाचं मुख्यालय असणाऱ्या रेशीम बाग परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने महानगर पालिकेने या भागात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात नागपूर महापालिकेकडून एक पत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
त्यामुळं धारावीत कोरोना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघाला स्वत:च्या मुख्यालयाच्या भागात कोरोना ला रोखता आलं नाही का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या संदर्भात कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याशी आम्ही बातचित केली असता त्यांनी

आपल्या दारावर आलेला कोरोना संघाला रोखता आला नाही. संघाची मनुस्मृतीची, जातीवादी विचारधारा आहे. दुसऱ्याचं श्रेय घेऊन एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचं काम संघ करत आहे. मात्र, अशा प्रकारे आयत्या बिळावर नागोबा येऊन बसला तरी नागोबा नेहमी विषच फुस्कारतो. देशाचे पंतप्रधान जेव्हा दिवे लावायला सांगते होते. तेव्हा राहुल गांधी test, treat & track अशा वैज्ञानिक सूचना देत होते. तेव्हा संघाने हा सल्ला पंतप्रधानांना का दिला नाही? संघपरिवाराने ग्राउंड लेव्हला जाऊन काम केल्याचा दावा केला जातो. मात्र, संघातील एखाद्या व्यक्तीला ग्राउंड झिरोवर काम केले म्हणून कोरोनाचा संसर्ग झाला का? तुम्ही जमीनीवर कोरोनाला रोखण्याचं काम करणाऱ्या कोरोना योद्ध्याचं कौतुक करण्याऐवजी हे यश आमचं आहे. असं बोलताना जनाची नाही तर… ठेवायला हवी होती. असे फोटो शॉप बंद करुन आपण भारतीय संविधानाला मानतो की नाही हे स्पष्ट करावे.

असं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here