Home > News Update > पोलीस बनायला गेला आणि कोठडीत जाऊन बसला

पोलीस बनायला गेला आणि कोठडीत जाऊन बसला

पोलीस बनण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर पोलीस कोठडीची हवा खाण्याची वेळ आली आहे काय आहे सोलापुरातील धक्कादायक प्रकार वाचा

पोलीस बनायला गेला आणि कोठडीत जाऊन बसला
X

पोलीस बनणे हे ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक तरुणांचे ध्येय असते. यासाठी तरुण शारीरिक परिश्रमासोबतच अनेक अवैध क्लुप्त्या लढवत असतात. अशीच एक क्लुप्ती लढवणे सोलापूर येथील विशाल रामेश्वर पुंड (रा.मु.भोयरे तालुका बार्शी) व राहुल लिंगराज महिमकर (रा.भोसले चौक पंढरपूर) यांना चांगलीच महागात पडली आहे.

पोलिस शिपाईपदासाठीच्या पद भरतीत या दोन उमेदवारानी तोतयेगिरी करत प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. कागदपत्रांची पडताळणी केली असता. त्यातील प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र बनावट निघाले. बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तयार करून पोलीस शिपाई या पदावर नियुक्ती मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या दोघांवर सदर बझार पोलीस ठाण्यात

भादवि ४२०,४६७,४७१ कलमाप्रमाणे सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अधिक तपास सदर बझार पोलीस करत आहे.

Updated : 2 Aug 2023 3:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top