Home > News Update > दाभोलकर, पानसरे प्रकरणाच्या तपासाला अंत आहे की नाही? हायकोर्टाने तपास यंत्रणांना फटाकरले

दाभोलकर, पानसरे प्रकरणाच्या तपासाला अंत आहे की नाही? हायकोर्टाने तपास यंत्रणांना फटाकरले

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी हायकोर्टाने कडक शब्दात सीबीआय़ आणि राज्य सरकारला फटकारले आहे.

दाभोलकर, पानसरे प्रकरणाच्या तपासाला अंत आहे की नाही? हायकोर्टाने तपास यंत्रणांना फटाकरले
X

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येचा तपास कधीपर्यंत पूर्ण करणार, असा सवाल मुंबई हायकोर्टाने सीबीआय आणि राज्य सरकारच्या एसआयटीला विचारला आहे.

न्यायमूर्ती जे.जे.शिंदे आणि मनिष पिटाळे यांच्या खंडपीठाने तपास यंत्रणांना चांगलेच धारेवर धरले. २०१७मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली होती आणि याप्रकरणी आता तिथे खटल्याला सुरूवात झाली आहे. पण महाराष्ट्रातील या दोन्ही प्रकरणांचा तपासही अजून पूर्ण झालेला नाही, या शब्दात कोर्टाने नाराजी व्यक्त करत, यंत्रणांना तपासाची स्थिती काय आहे याचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

"२०१३ मध्ये घटना घडल्या आहेत आणि २०२१ सुरू आहे, याला काहीतरी अंत आहे की नाही? कर्नाटकमधील गौरी लंकेश प्रकरणाचा खटला सुरू झाल्याचे आम्हाला याचिकाकर्त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही खूप डिस्टर्ब झालो आहोत. कर्नाटकमधील घटना नंतर घडून त्याचा खटला सुरू होतो आणि इकडे तपासही पूर्ण होत नाही." असे कोर्टाने म्हटले आहे. यासंदर्भात सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी सीबीआय वेळोवेळी तपासाची माहिती देत असल्याचे सांगितले. यानंतर कोर्टाने पुढील सुनावणी ३० मार्च रोजी ठेवली आहे. य़ावेळी तपासाची प्रगती कुठपर्यंत आली याची माहिती देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

Updated : 13 March 2021 12:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top