Home > News Update > 'समीर दाऊद वानखेडे' नावानेच निकाह लावला, मौलाना यांची माहिती

'समीर दाऊद वानखेडे' नावानेच निकाह लावला, मौलाना यांची माहिती

समीर दाऊद वानखेडे नावानेच निकाह लावला, मौलाना यांची माहिती
X

NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुस्लिम असूनही खोटे प्रमाणपत्र देत नोकरी मिळवली असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद आहे, असाही दावा मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या निकाहाचे प्रमाणपत्र देखील ट्विट केले आहे. दरम्यान समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपण हिंदू असून तसे सर्व कागदोपत्री पुरावे असल्याचा दावा केला आहे.

पण आता वानखेडे हे खोटे बोलत असल्याचा दावा समीर वानखेडे आणि डॉ. शबाना यांचा निकाह लावणाऱ्या मौलाना मुजम्मिल अहमद यांनी केला आहे. समीर वानखेडेंचे वडील मुस्लिम आहेत, आणि समीर वानखेडे मुस्लिम असल्यानेच आपण त्यांचा निकाह लावला असेही मौलाना यांनी म्हटले आहे.

Updated : 2021-10-27T15:39:27+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top