Home > News Update > योगी सरकारला अखेर जाग, हाथरस एसपी निलंबित...

योगी सरकारला अखेर जाग, हाथरस एसपी निलंबित...

योगी सरकारला अखेर जाग, हाथरस एसपी निलंबित...
X

उत्तर प्रदेश मध्ये हाथरस येथे तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने देसभरात संताप व्यक्त केला जात आहे. पीडित तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तरुणीवर गॅग रेप झाला असल्याचं अगोदर सांगण्यात आलं. त्यानंतर रेप झालाच नाही असं सांगण्यात आलं. विशेष बाब म्हणजे पीडित तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबाला न कळवताच अंत्यसंस्कार केले.

हे सर्व घडत असताना उत्तर प्रदेश सरकारने गेल्या तीन दिवसात कुठलीही कारवाई केली नाही. मात्र, आज या संदर्भात एक ट्विट केलं.

'' दोषींना अशी शिक्षा मिळेल जी भविष्यात उदाहरण म्हणुन दिली जाईल, असे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ट्वीट करुन सांगितले आहे.''

उत्तर प्रदेश में माताओं-बहनों के सम्मान-स्वाभिमान को क्षति पहुंचाने का विचार मात्र, रखने वालों का समूल नाश सुनिश्चित है। इन्हें ऐसा दंड मिलेगा जो भविष्य में उदाहरण प्रस्तुत करेगा। आपकी @UPGovt प्रत्येक माता-बहन की सुरक्षा व विकास हेतु संकल्पबद्ध है। यह हमारा संकल्प है-वचन है।...

'' दोषींना अशी शिक्षा मिळेल जी भविष्यात उदाहरण म्हणुन दिली जाईल, असे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दुपारी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं होतं’’ मात्र, दोषी म्हणून योगी सरकारने

हाथरस चे एसपी, डीएसपी, इंस्पेक्टर आणि काही अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. एसपी विक्रांत वीर, सीओ राम शब्द, इंस्पेक्टर दिनेश कुमार वर्मा यांच्यासह हेड कॉन्सटेबल महेश पाल यांना निलंबित केले आहे.

Updated : 2 Oct 2020 4:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top