Home > News Update > " #भाजपाकेआतंकवादी" हा हॅशटॅग का आहे ट्रेंडिंगवर?

" #भाजपाकेआतंकवादी" हा हॅशटॅग का आहे ट्रेंडिंगवर?

 #भाजपाकेआतंकवादी हा हॅशटॅग का आहे ट्रेंडिंगवर?
X

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने उडवल्याच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. सर्वत्र संताप व्यक्त होतो आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मित्रा याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे, पण त्याला अटक झालेली नाही. त्यामुळे अजय मिश्रा यांचा राजीनामा घ्याला आणि आशिष मित्राला अटक करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. याच मुद्द्यावरुन सोशल मीडियावर देखील सरकारवर जोरदार टीका होते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजप नेतेही याबाबत गप्प आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर भाजपवरही जोरदार टीका होते आहे. यातूनच ट्विटरवर "#भाजपाकेआतंकवादी" हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे.

शेतकऱ्यांना जीपने उडवल्याचा व्हिडिओ प्रियंका गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लखीमपूरला येण्याचे आग्रह करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तर अनेकांनी हा हॅशटॅश वापत भाजपवर जोरदार टीका केली आहे. जवळपास १ लाख ३७ हजार लोकांनी "#भाजपाकेआतंकवादी" हा हॅशटॅग वापरत सरकावर टीका केली आहे.

Updated : 5 Oct 2021 8:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top