Home > News Update > हर्षवर्धन जाधव यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा,जाहीर केला वारसदार

हर्षवर्धन जाधव यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा,जाहीर केला वारसदार

हर्षवर्धन जाधव यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा,जाहीर केला वारसदार
X

कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. हर्षवर्धन जाधव हे कन्नड चे माजी आमदार असून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी यापुढे आपल्या राजकारणाची उत्तराधिकारी संजना जाधव असतील अशी घोषणा केली आहे.

लॉकडाउन सुरु असल्याने सर्वजण वाचनाचा छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. यामधून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं जाधव यांनी आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय.

यापुढे सामाजिक, राजकीय विषया संदर्भात त्यांच्या पत्नीची भेट घ्यावी असं आवाहन त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे.

घरगुती वाद...

मध्यंतरी जाधव कुटुंबातील वाद विकोपाला गेला होता. त्यांच्या आई तेजस्विनी जाधव आणि पत्नी संजना जाधव यांच्यात वाद झाला होता. तेजस्विनी जाधव यांनी आपली सून संजना यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात केली होती.

राजकीय कारकीर्द

    • हर्षवर्धन जाधव हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.
    • हर्षवर्धन जाधव हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते.
    • मात्र पाच वर्षांच्या आत त्यांनी पक्षांतर्गत मतभेदामुळे मनसेला सोडचिठ्ठी दिली होती.
    • त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
    • 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला.
    • 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही हर्षवर्धन जाधव यांना विजय मिळवता आला नाही.
    • शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी त्यांचा पराभव केला.

Updated : 23 May 2020 9:55 AM GMT
Next Story
Share it
Top