Home > News Update > Hari Narke Passed Away: ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

Hari Narke Passed Away: ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

Hari Narke Passed Away: ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन
X

ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. Asian Heart Hospital मध्ये घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या ६० व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एशिअन हार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.

प्रा. हरी नरके यांचे महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा हे त्यांचे पुस्तक चांगलच प्रसिद्ध झाले आहे. फेब्रुवारी २०११ पासून ते ब्लॉग लिहितात. सोशल मीडियावरही ते सतत सक्रीय होते. अनेक सामाजिक विषयांवर ते थेट भाष्य करत असतं. हरी नरके यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गटाला आपल्या ब्लॉगमधून आधार दिला होता. त्यांचे अनेक लेख काही वर्तमानपत्रांतही प्रसिद्ध झाले आहेत.


प्रा. हरी नरके आणि त्यांचे साहित्य

महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ जनमानसात रुजवण्यासाठी काम करणारे विचारवंत म्हणजे प्रा. प्रा. हरी नरके. त्यांनी आयुष्यभर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ओबीसी समाज, आरक्षण याविषयी काम केले. आज प्रा. हरी नरके यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यानिमित्ताने हरी नरके यांच्या साहित्याचा घेतलेला वेध...

प्रा. डॉ. हरी नरके यांनी ३५ पुस्तकांचे लेखन आणि संपादन केले आहे. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दलित चळवळ यांचा समावेश आहे.

प्रा. हरी नरके यांची पुस्तकं

महात्मा फुले यांची बदनामी एक सत्यशोधन

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले

ओबीसींच्या भवितव्यावर कुऱ्हाड

दलित साहित्याच्या शोधात ( भारताचे माजी राष्ट्रपती के आर नारायण यांच्या हस्ते प्रकाशन)

महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा

हिंदी साहित्य

महात्मा फुले साहित्य और विचार ( माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते प्रकाशन)

महात्मा फुले समस्त साहित्य Vlog 1 to 4

इंग्रजी साहित्य

संपादन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस Vols 17-22

कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा फुले Vols 1-3

व्याख्यानं

गेल्या ३० वर्षात प्रा. हरी नरके यांनी ६००० पेक्षा जास्त व्याख्यानं दिले आहेत. त्यामध्ये लंडन, बर्मिंगहॅम, मँचेस्टर, बेडफोर्ड, दुबई, शर्जाह, अबू धाबी, अल ऐन, काठमांडू आणि लुंबिनी यांसह देशभरातील अनेक ठिकाणांचा समावेश आहे.

टिव्ही मालिका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा आणि एक महानायक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिका प्रा. हरी नरके यांच्या संशोधनावर आधारित होत्या.

Updated : 9 Aug 2023 6:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top