Home > News Update > हरेगावमधील दलित मुलाला मारहाण प्रकरणी अजित पवार एक्शन मोडवर

हरेगावमधील दलित मुलाला मारहाण प्रकरणी अजित पवार एक्शन मोडवर

हरेगावमधील दलित मुलाला मारहाण प्रकरणी अजित पवार एक्शन मोडवर
X


दोन दिवसांपुर्वी अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथील दलित मुलाने कबुतर चोरल्याचा आरोप करीत दलित मुलाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील दलित मुलाला कबुतर चोरल्याचा आरोप करीत अमानुष मारहाण करण्यात आली होती. तसेच त्या मुलाच्या अंगावर लघवी करून त्याला थुंकी चाटायला लावल्याचा अमानुष प्रकार समोर आला होता. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच आता या दलित अत्याचार प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे,अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

हरेगाव येथे दलित मुलाला मारहाण केल्याप्रकरणी युवराज गलांडे आणि मनोज बोडखे यांना पुण्यातून अटक करण्यात आली. तर उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगाने फिरवण्यास सुरूवात केली आहेत. त्यामुळे उर्वरित आरोपींनाही लवकरात लवकर पकडण्यात येईल, अशी माहिती अहमदनगरचे पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी दिली.

गुन्हा दाखल होताच आरोपी युवराज गलांडे आणि मनोज बोडखे हे मोबाईल बंद करून पसार झाले होते. त्यानंतर अखेर पोलिसांनी त्यांना पुण्यातून अटक केली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, या प्रकरणाची मी माहिती घेणार असून त्या आरोपींना कठोरात कठोर शासन करण्यात यावे, याची कलमं लावण्यासंदर्भात मी पोलिस अधिक्षकांशी बोलणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

Updated : 28 Aug 2023 8:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top